तेर / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये  यांच्या वतीने वृक्षांना लावलेले टी गार्ड  चोरणाऱ्या चोरट्यांचा सुळसुळाट वाढल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 

 तेर (ता .उस्मानाबाद)  येथील ग्रामसेवा संघ सामाजिक संस्था , शाळा, महाविद्यालये यांच्या वतीने शाळेच्या प्रांगणासह गावातील सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले आहे .यावेळी लागवड करण्यात आलेल्या वृक्षांच्या संरक्षणासाठी शाळा, महाविद्याल, ग्रामसेवा संघ सामाजिक संस्थेच्या वतीने हजारो रुपये किंमतीचे वृक्षांना लावलेले टी गार्ड अज्ञात चोरट्यांकडून चोरुन नेण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरू असल्याने शाळा, महाविद्यालये व सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे . ग्रामसेवा संघाने तेरच्या मुख्य रस्त्याच्या कडेला अनेक झाडे लाऊन जोपासली आहेत.परंतू पाच झाडाचेटी गार्ड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहेत. २५ ऑगस्टला जिल्हा परिषद केंद्रीय शाळेच्या प्रांगणात लावण्यात आलेल्या वृक्षांना लावलेले टी गार्ड चोरीचा अज्ञात चोरट्यांकडून प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या शाळेच्या परिसरात सिसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत .त्यामुळे टी गार्ड चोरट्यांचा या सिसीटिव्ही फुटेजच्या माध्यमातून टी गार्ड चोरट्यांचा पत्ता लावण्यास मदत होईल .त्यामुळे  पोलिसांनी तेर येथील टी गार्ड चोरीच्या घटना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवून टी गार्ड चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी नागरिकांतून होत आहे


 
Top