वाशी / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद जिल्ह्यात शिधापत्रिकांबाबत अडचणी निर्माण होत होत्या . त्या सोडविण्यासाठी खासदार तथा दिशा समितीचे अध्यक्ष ओमराजे निंबाळकर यांनी १५ जुलै रोजी झालेल्या बैठकीत प्रशासनाला सूचना दिल्या होत्या . त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ . चारूशीला देशममुख यांनी सर्व तहसीलदारांना माझी शिधापत्रिका , माझा हक्क ‘ ही मोहीम राबविण्याची सुचना दिली होती .मा.जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे आदेश क्र २०२१/पुरवठा/कार्या-१३/कावी-दिनांक २२/०७/२०२१ अन्वये  वाशी तालुक्यात मंडळ निहाय दिनांक ०१/०८/२०२१ ते ३१/०८/२०२१ या कालावधीमध्ये शिबीर आयोजित  करण्यात आले होते.

 तालुक्यातील तिन्ही मंडळामध्ये तहसीलदार नरसिंग जाधव  , नायब तहसीलदार पुरवठा स्न्हेलता पाटील  ,पुरवठा अव्वल कारकून चौधरी ,सहकारी दीपक गायकवाड , मंडळ अधिकारी दत्तात्रय गायकवाड ,दिगंबर माळी,शिवाजी उंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ माझी शिधापत्रिका , माझा हक्क ‘ या मोहिमेअंतर्गत शिबिरामध्ये मध्ये जीर्ण शिधापत्रिका बदलून देणे , शिधापत्रिकेतील नाव कमी करणे , नाव समाविष्ट करणे या सह शिधापत्रिका संदर्भात इतर अडचणी या सोडवल्या गेल्या आहेत . त्याच बरोबर या शिबिरामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्र सुद्धा देण्यात  देण्यात आले .तिन्ही मंडळामध्ये एकूण ६७० अर्ज प्राप्त झाले असून सदरील अर्जावर  शिबिराच्या दिवशीच तात्काळ कार्यवाही करण्यात  आली .त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केला जात आहे.


 
Top