तुळजापूर / प्रतिनिधी-

श्रावणी सोमवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी आल्याचा पार्श्वभूमीवर येथील श्री विठ्ठल रूक्मीणी मंदीरात श्री विठ्ठल-रखुमाई  सिंहासनावर शेषशाही अलंकार महापुजा मांडण्यात आली होती.

येथील दिपक चौकातील  हनुमान तसेच कासार गल्लीतील श्री विठ्ठल-रखुमाई मंदीरात श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा पारंपरिक पध्दतीने उत्साहात पार पडला . श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर सिंदफळ येथील श्रीमुदगुलेश्वर मंदीरात आकर्षक फुलांचा आरास करण्यात आला होता. सांयकाळी महाआरती करण्यात आली.श्रावणानिमित्ताने गावकुसा बाहेर  निसर्गसानिध्यात असणाऱ्या  श्री शंभु महादेव दर्शनार्थ  भाविकांनी गर्दी केली होती.

 
Top