तुळजापूर / प्रतिनिधी-

तुळजापूर -ठाणे महानगरपालिका उपायुक्त श्रीमती कल्पिता पिंगळे यांच्या वर झालेल्या भ्याड हल्याचा  नगरपालिका तुळजापुर  तर्फे मंगळवार दि.31 रोजी  जाहिर निषेध करून  कर्मचाऱ्यांनी काळी फित लावुन  कामबंद आंदोलन केले.

यावेळी   मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, शिक्षक व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय साळुंके, काळे, अभंग गायकवाड, शिवरत्न अतकरे, इंदापूरकर, अरुणा रोकडे, प्रफुल्लता बरुरकर, शोभा कांबळे, जयश्री कांबळे  सह नगरपरिषद कर्मचारी आदींनी निषेध आंदोलनात भाग घेतला. 

 
Top