उमरगा / प्रतिनिधी-

 जिल्हा क्रीडा कार्यालय उस्मानाबाद कडून जिल्हा परिषद हायस्कूल उमरगा शाळेला तीन लाखाचे क्रीडा साहित्य मिळाले आहे. या क्रीडा साहित्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक क्रीडा प्रकारात भाग घेता येणार आहे. 

गोळा, थाळी, ढोल, हार्डल्स, भाला ,खो खो,पोल, चेस बोर्ड, कॅरम बोर्ड ,क्रिकेट साहित्य, लेझीम, स्पोर्ट वॉच ,योगा मॅट ,स्कीपिग रोप, वजन काटा ,बॅडमिंटन रॅकेट, बासरी  इत्यादी सर्व प्रकारच्या खेळाचे साहित्य आल्यामुळे विद्यार्थ्यांना खेळाबद्दल आवड निर्माण होऊन मुलांचा शारीरिक व मानसिक विकास होणार आहे. स्पर्धेत सहभाग नोंदवता येणार आहे. हे साहित्य विद्यार्थ्यांसाठी खूपच उपयुक्त असल्याचे मत क्रीडाशिक्षक बाबासाहेब जाधव यांनी व्यक्त केले .क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले अशोक बनसोडे यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांनी क्रीडासाहित्य शाळेला मिळवून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी शाळेतील शिक्षक धनराज तेलंग ,बशीर शेख ,चंद्रशेखर पाटील, उपस्थित होते.

 
Top