उमरगा / प्रतिनिधी-

आष्टा जहागीर येथील सुरेश शंकरराव पाटील यांच्या घरावर शुक्रवारी (दि.६) रोजी सायंकाळी चारच्या दरम्यान घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले सात तोळे सोने, तीस तोळे चांदी व तुरीच्या पट्टीचे आडीच लाख रुपये रोख रक्कम असा सहा लाखांपेक्षा जास्त रकमेचा माल घेऊन चोरटे पसार झाले.

 शुक्रवारी (दि.६) रोजी आष्टा जहागीर येथील सुरेश पाटील हे पत्नीसह शेताकडे गेले होते. त्यांनी मागील वर्षीच्या तुरी विकुण आलेली आडीच लाख रुपये पट्टी कपाटात ठेवली होती. सायंकाळी चारच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांचे घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. व कपाटात ठेवलेले सात तोळे सोने, तीस तोळे चांदी व आडीच लाख रुपये रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले आहेत. सदरची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मुंकुद आघाव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तर उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले यांनी पोलिस ठाण्यात अधिकारी व पिडीत शेतकऱ्यांशी चर्चा केली. गुन्हे अन्वेषण शाखेची टीम रात्री उशीरा घटनास्थळी पोहोचली असुन घटनेची चौकशी सुरू होती. रात्री उशिरापर्यंत उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

 
Top