परंडा शहरातील खासापुरी रोड येथील परिसरातील नागरीकांचा कायम स्वरुपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व लाइट च्या पोल चा प्रश्न नगराध्यक्ष जाकीर भाई सौदागर यांच्या पुढाकाराने सोमवार दि.१६ रोजी सोडवण्यात आला.
खासापुरी रोड परिसरातील मागील अनेक वर्षांपासून पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्या मुळे हा प्रश्न मार्गी लावण्यात यावा अशी मागणी येथील नागरिकांनी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या कडे केली होती.यावरून हा प्रश्न कायम स्वरुपी मिटावा आणि या भागातील कुटुंबांना मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी मिळावे यासाठी सोमवार दि.१६ रोजी नवीन पाईप लाईन टाकण्यासाठी भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी नवाज शेख, नसीम पठाण, सत्तार पठाण, जावेद बागवान, जंगु पठाण, बागवान साहब अफसर पठाण, फय्याज शेख, मोसीन हावरे ,सय्यद साहब ,ईस्माईल शेख इमु पठाण, जलाल मुजावर, तनवीर मुजावर सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.