परंडा / प्रतिनिधी : -

ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा या संस्थेचे सचिव व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा उपकेंद्र उस्मानाबाद चे माजी संचालक प्राचार्य डॉक्टर अशोक मोहेकर यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाच्या जीवन साधना पुरस्काराने विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

 यावेळी कृषिरत्न बी.बी.ठोंबरे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रा.कुलगुरू डॉ. श्याम शिरसाट ,व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. जयसिंगराव देशमुख, संजय निंबाळकर, राहुल मस्के, डॉ.विलास खंदारे ,डॉ.राजेश करपे, कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी ,उपकेंद्राचे संचालक डॉ.दत्ता गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार सोहळा संपन्न झाला.याप्रसंगी मराठवाड्यातील विविध महाविद्यालयाचे प्राचार्य,प्राध्यापक,प्राचार्य डॉक्टर अशोक केळकर यांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने कोव्हीड - १९ पालन करत उपस्थित होते. यावेळी श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद आणि शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय परंडा या महाविद्यालया च्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे सचिव संजय निंबाळकर महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी डॉ.शहाजी चंदनशिवे,आई क्यू ए सी चे चेअरमन डॉ.महेशकुमार माने प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अतुल हुंबे वनस्पती शास्त्राचे प्रा.डॉ.सचिन चव्हाण वाणिज्य विभागाचे प्रा.संतोष काळे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपकेंद्राचे संचालक डॉ.दत्ता गायकवाड यांनी केले.या सत्कार समारंभ प्रसंगी डॉ.राजेश करपे, संजय निंबाळकर ,बी.बी. ठोंबरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सत्काराला उत्तर देताना प्राचार्य डॉ.अशोक मोहेकर यांनी केलेल्या कार्याचा वृत्तांत सर्वांसमोर मांडला . सेवेमध्ये असताना आणि प्रशासनामध्ये  काम करत असताना काम कसे करावे आणि कसे करून घ्यावे यासंदर्भात त्यांनी मोलाचा सल्ला दिला.सर्वांच्या सहकार्यामुळे मला माझ्या सेवेमध्ये उत्तमरित्या काम करता आले.मी संस्थापक म्हणून नव्हे तर एक सहकारी म्हणून सर्वांशी प्रेमाने वागले पाहिजे त्यांना मदत केली आणि त्यामुळे सर्वांच्या सहकार्याने मी माझी पूर्ण सेवा प्रामाणिकपणे केली असे त्यांनी यावेळी सांगितले.अध्यक्षीय समारोप कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी केला.त्यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपामध्ये  सांगितले की जीवनसाधना पुरस्कार हा त्याच व्यक्तीला मिळाला ज्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये केवळ शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये अनमोल असे योगदान दिले.त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी निष्कलंक सेवा केली. निष्कलंक प्राचार्य ,निष्कलंक संचालक, एक आदर्श व्यक्तिमत्व निर्माण केले.विद्यापीठाच्या अनेक समित्यावर कार्यरत होते.त्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन आपल्या कारकिर्दीमध्ये प्रामाणिकपणे सेवा केली आहे.मराठवाड्यात, महाराष्ट्र राज्यामध्ये एक आदर्श संस्थापक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.विद्यापीठाच्या संयोजन समितीने त्यांचा नामोल्लेख केला आणि त्यास सर्वांकडून अनुमोदन मिळाले हीच त्यांची खरी ओळख आहे. 

यावेळी उपकेंद्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यामध्ये डॉ.प्रशांत दीक्षित, डॉ. सुयोग अमृतराव, डॉ.डी.एम.नेटके ,डॉ.जयश्री शिंदे व शिक्षकेतर कर्मचारी एम आर खंडागळे किरण शिंदे सोमवंशी धनराज यांनी उपकेंद्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केल्यामुळे त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.शेवटी कार्यक्रमाचे आभार कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी यांनी मानले. .


 
Top