उस्मानाबाद / प्रतिनिधी-

धाराशिव कारखाण्याचे चेअरमन  अभिजीत पाटील यांच्या ३८ व्या.वाढदिवसाचे औचित्य साधुन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चोराखळी येथे  राजमाता ग्रुप ,राजमाता नर्सरी,व,राजमाता अर्थमुव्हर्स व राजमाता ट्रेडींग कपंनी यांच्या सहकार्याने वृक्षारोपनाचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.

प्रारंभी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निम्मित्ताने त्यांच्या प्रतीमेचे पुजन करुन त्यांना वंदन करण्यात आले.

 यावेळी सुरेश तात्या पाटील , मदनतात्या बारकुल, चरणेश्वर पाटील , खंडेराव मैंदाड  आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी  विष्णु मैंदाड,  पांडुरग मैंदाड,गोपिनाथ मैंदाड अभिमान्यु कोकाटे,हरीभऊ मैंदाड,श्रीकांत मैंदाड,पिंटु पाटील,आझाद शेख,काशीनाथ ढगारे,दत्तात्रय मुंढे,प्रविन मांडवकर यांनी प्रयत्न केले.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  आरगडे रामदास व  आभार भक्ताज दिवाणे यांनी व्यक्त केले.

 
Top