कळंब / प्रतिनिधी- 

शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे  यांच्या वाढदिवसानिमित्त व आदेशानुसार राज्यभरात   शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत असून या अभियानांतर्गत कळंब तालुक्यातील वाकडी (इ), लासरा, रांजणी येथे  पंचायत समिती गणातील शिवसैनिक, युवासैनिक यांच्याशी आ. कैलास पाटील यांनी संवाद साधत आढावा घेतला.

शिवसंपर्क अभियानाच्या दरम्यान लासरा येथे वृक्षारोपण केले. यावेळी संघटनात्मक पक्षबांधणी, बुथ रचना, बुथप्रमुख, गटप्रमुख, सहगटप्रमुख यांच्या नियुक्त्या, पदाधिकारी यांच्या अडीअडचणी यांचा आढावा घेण्यात आला. तसेच शिवसैनिकांनी संकटाच्या वेळी प्रत्येक घरा घरात जाऊन जनतेच्या अडचणी समस्या सोडवत अधिक कार्यक्षमतेने काम करण्याच्या सूचना आ कैलास पाटील यांनी  दिल्या.

याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख शिवाजी आप्पा कापसे, पंचायत समिती सभापती संगीताताई वाघे, जिल्हा परिषद सदस्य बालाजी बप्पा जाधवर, उपतालुकाप्रमुख भारत नाना सांगळे, शहरप्रमुख प्रदिप बप्पा मेटे, वाहतूक सेना तालुकाप्रमुख बापू जोगदंड, युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर बाराते, तालुकाप्रमुख मनोहर आबा धोंगडे, पंचायत समिती सदस्य राजेश्वर पाटील,लासरा सरपंच नवनाथ मदने, रांजनी सरपंच राजभाऊ आगरकर, बोरगाव सरपंच अजय समुद्रे, पिंप्री शी सरपंच सुग्रीव पाडे, वाकडी ई सरपंच मिराताई बनसोडे उपसरपंच बाबा शिंदे सह परिसरातील आजी माजी सरपंच ,उपसरपंच,तंटा मुक्ती अध्यक्ष,सोसायटी चेअरमन  पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top