लोहारा/प्रतिनिधी

मोहरम सणानिमित्त मिलाफ मित्र मंडळाच्यावतीने  लोहारा शहरातील शिवाजी चौकात सालाबादप्रमाणे यंदाही शरबत वाटप करण्यात आले. 

या शरबत वाटपाचा शुभारंभ शहाहुसन आबुलहासनसाब कादरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मिलाफ मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दादाभाई हाजी हुसेनसाब  मुल्ला, माजी नगरसेवक श्रीनिवास माळी, बाळासाहेब पाटील, माजी नगरसेवक आयुब अब्दुल शेख, शब्बीर गवंडी, प्रमोद बंगले, जिंवावली शेख, नवेद खानापुरे, राष्ट्रवादी तालुका कार्याध्यक्ष उमेश देवकर, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, जब्बार मुल्ला, अस्लम अत्तार, अबू शेख, बशीर बोबाटे, खाशिम मुल्ला, आदम मुल्ला, जलाल मुल्ला, अमित विरुध्दे, सुरज शिंदे, अरबाज मुल्ला,  आदि  उपस्थित होते.

 
Top