उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरानजीक बालाजीनगर शेकापूर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरासमोरील सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन स्वातंत्र्य दिनी ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.30 वाजता भाजपा नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, उस्मानाबाद नगर परिषदेचे उपाध्यक्ष अभय इंगळे,भाजपा तालुकाध्यक्ष राजाभाऊ पाटील, जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजित देवकते, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, शेकापूरचे सरपंच किरण लगदिवे, कार्यक्रमाचे आयोजक तथा भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष क्षीरसागर, माजी सरपंच महेश मैराण यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आ. राणाजगजितसिंह पाटील म्हणाले, शेकापूर भागातील बालाजीनगर येथे नियोजित जागेत आरोग्य उपकेंद्र बांधकाम लवकरात लवकर चालू करण्यात येईल. त्याचबरोबर अंतर्गत रस्त्याचा विषय देखील तातडीने मार्गी लावण्याचे आदेश संबंधितास दिले. तसेच याभागतील महिलांनी  महिला बचत गटाच्या माध्यमातुन लघु उद्योग उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा. आवश्यक ती मदत आपण करू असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी शेकापूर भागातील विविध कामांचा त्यांनी आढावा घेतला.

भूमिपूजन सोहळ्यास जेष्ठ नागरिक सुरेश शिंगणापुरे, बाळासाहेब वायकर, श्रीराम इरकटे, प्रमोद डांगे, ओंकार वायकर, अनंत साखरे, शुभम जाधव, अजय घोडके, दीपक रसाळ, शिवकुमार भडंगे, नागेश भादुले, महादेव जाधव, मुकुंद जगदाळे, नंदकुमार नागवसे, रमेश साखरे, विकास पांचाळ, संग्राम सपकाळ,श्री परशुराम रसाळ, तेजसकुमार नागवसे, आदित्य ढवळे, बालाजी भिसे, अजय सपकाळ, प्रतीक माळी, प्रतीक राठोड, सोनू डुकरे, बलराज देवकते, नामदेव राठोड, श्री. काटे, श्री. राठोड, सौ.कल्पना यादव, सौ. फेरे, सौ. सुरेखा वायकर, सौ. छाया नागवसे, सौ. मंगल नागवसे, सौ. डांगे, सौ. नारकर, सौ. राणी बुरुंग, सौ.पवार यांच्यासह तसेच पुरूष, महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी महेश काटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.


 
Top