उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेच्या  बैठक  शासकीय विश्रामगृह उस्मानाबाद येथे दि.  १६ ऑगस्ट  रोजी झाली. या बैठकीसाठी  शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मा श्री अनिल घनवट  तसेच  महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा  सौ.सीमाताई नरोडे  महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष मा श्री शंकर गायकवाड  व महाराष्ट्र राज्याचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते  या बैठकीमध्ये  कार्यकर्त्यांसोबत  चर्चा करून  शेतकरी संघटनेच्या  मराठवाडा अध्यक्षपदी श्री रामजीवन बोंदर यांची  निवड करण्यात आली या निवडीचे   नियुक्तिपत्र  शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मा श्री अनिल घनवट  यांच्या हस्ते देऊन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या

तसेच  बैठकीमध्ये  जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या  विविध समस्येचा आढावा घेण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने विजेच्या समस्यांबद्दल  तसेच पिक कर्ज वितरण  प्रणालीबाबत सण २०२० मधील खरीप पीकविमापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत  ,गतवर्षीच्या गाळप हंगामातील ऊस-उत्पादक शेतकऱ्यांच्या एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्यासाठी  व शासनाने कर्जमाफी यादीतील शेतक-यांची कर्जमाफी झालेली रक्कम त्यांच्या बँक खात्यात न टाकल्यामुळे शेतकऱ्यांना बँकेच्या  पीक कर्जापासून वंचित राहण्याची वेळ आली तसेच केंद्र शासनाच्या नवीन ३ कृषी  कायद्याविषयी सखोल चर्चा करण्यात आली  व जिल्ह्यातील शेतकर्यांच्या इतर समस्यांवर विचारविनिमय करण्यात आला व पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली  

या बैठकीला प्राध्यापक मारुती कारकर ,विठ्ठल गवळी नांदेड , परमेश्वर अप्पा पिसुरे बीड,    लातूर जिल्हाध्यक्ष रूपेश शके   ,संतोष राठोड  ,सिद्धेश्वर सुरवसे  ,भारत पाटील , ‘अॅडव्होकेट नेताजी गरड , चंद्रकांत भराटे , संजय वाघ , सुशीलकुमार पाडोळे , शिवाजीराव काळे, महेश गव्हाणे , सचिन खडके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top