उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भाजपा परंडा ता.सरचिटणीसपदी श्री रामेश्वर चोबे,भाजपा परंडा तालुका उपाध्यक्षपदी श्री रवी गरड ,चिटणीसपदी श्री सुजितसिंह परदेशी तर भाजपा युवा मोर्चा धाराशिव जिल्हा चिटणीसपदी श्री रामकृष्ण घोडके यांची निवड झाल्याबद्दल भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.श्री सुजितसिंह ठाकुर साहेबांच्या जनसंपर्क कार्यालयात सत्कार करण्यात आला.

 यावेळी भाजपा जिल्हा संघटन चिटणीस श्री रामचंद्र कुलकर्णी , बाजार समितीचे सभापती श्री संतोष सुर्यवंशी युवा नेते श्री संकेतसिंह ठाकुर, ॲड. तानाजी वाघमारे, ॲड.अमोल पाटील उपस्थित होते. यावेळी अँड सुर्यवंशी  यांनी उपस्थित सहकाऱ्यांना मार्गदर्शन करताना आपण सर्वांनी केंद्र सरकारने जनतेच्या कल्याणासाठी राबिवण्यात येणाऱ्या योजना जनतेपर्यत पोहचविण्याची विनंती केली.याच बरोबर ते पुढे बोलताना ते म्हणाले आपण यशाच्या काळात सोबत नसलो तरी चालेल पण संकटसमयात आपल्या माणसासोबत आपण भक्कमपणे उभ राहणे आपलं कर्तव्य आहे. साहेबांना आजारपणाने ग्रासले त्यामुळे ते बरेच दिवस संघटनेपासुन लांब असले तरी ते लवकरच परत आपल्यात सक्रीय होत आहेत त्यांना संघटनेत कोणतेही कमतरता जाणवू नये म्हणून आम्ही पुन्हा सक्रीय होत आहे. तालुक्यातील कोणत्याही कार्यकर्त्याला अडचण आल्यास मी २४ तास तुमच्यासाठी उपलब्ध असल्याचे आश्वसित केले. 

यावेळी ज्येष्ठ नेते मधुकर आबा ठवरे, युवा मोर्चाचे तालुका सरचिटणीस अरविंद रगडे , लक्ष्मण गोरे, ॲड.अभय देशमुख, ॲड.संदीप शेळके,सरपंच तुकाराम हजारे,सरपंच परसराम कोळी,सरपंच शरद कोळी,धनाजी गायकवाड, अजित काकडे, सारंग घोगरे,अमोल गोफने, नारायण लिमकर,किरण कवटे, अनिकेत काशीद, सिद्दिक हनुरे धनंजय काळे,सूरज काळे, गौरव पाटील, अनुराग ठाकूर, रणजित शिंदे,रामदास गुडे , अमर जामदाडे आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top