उस्मानाबाद / प्रतिनिधी-

वैकुंठवाशी ह.भ.प. गुरूवर्य भगवान भाऊ येडशीकर यांच्या 29 व्या पुण्यतिथीनिमित्त सगल 29 वर्ष अखंड सेवा ह.भ.प. गुरूवर्य महादेव महाराज तांबे आळणीकर यांच्या वाड्यात अविरत चालु आहे.

यावेळीही कोरोनाचे सर्व नियम पाळुन साध्या पध्दतीने 17/8/2021 ते 23/07/2021 रोजी सात दिवसाचा अखंड हरीनाम सप्ताहात सकाळी 4 ते 6 काकडा भजन,9 ते 1 गाथा भजन,2 ते 4 महिला भजन, 4 ते 5 प्रवचन,5 ते 6 हरीपाठ रात्री 9 ते 11 किर्तन नंतर हरीजागर अशा दिनक्रमान उत्साहात   सोमवारी सप्ताहाची सांगता गुरूवर्य ह.भ.प. महादेव महाराज तांबे आळणीकर यांच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता करण्यात आली.

या सप्ताहात आळणी व परीसरातील गावांनी अन्नदान केले.तसेच शिंगोली,खेड,कुमाळवाडी,येडशी,कोथळा,जवळा,चिंचोली,पांगरी,हाळदगाव आदिसह आळणीतील ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन सप्ताह पार पाडला.

 
Top