उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 साहित्य क्षेत्रातील अलौकिक व्यक्तिमत्व, उत्कृष्ट कवी, कथाकार , समीक्षक असे चतुरस्त्र साहित्यिक स्व. श.मा. पाटील यांच्या नावे शांतिदूत परिवार तर्फे उत्कृष्ट साहित्यासाठी (गद्य/पद्य) राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येणार असून, २२ ऑगस्ट रोजी श.मा. पाटील यांच्या जन्मदिनी शहरातील शिवशंभूपंढरी वसाहत

सार्थसत्य  सभागृहात आयोजित अभिवादन कार्यक्रमात प्रास्ताविकपर भाषणात शांतिदूत परिवार जिल्हाध्यक्ष  युवराज नळे यांनी त्याची घोषणा केली.

 १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या कवितासंग्रहाला रोख रक्कम, सन्मानचिन्ह, मानपत्र देऊन हा पुरस्कार दिला जाणार आहे. प्रतिवर्षी कै.श मा पाटील यांच्या जयंतीदिनी हा पुरस्कार देण्यात येणार असून तज्ञ निवड समिती मार्फत अत्यंत पारदर्शकपणे निवड प्रक्रिया होऊन दर्जेदार साहित्यकृतीलाच न्याय देण्यात येईल असे सांगून शांतिदूत परिवार चे मार्गदर्शक माजी पोलीस महासंचालक विठ्ठल जाधव यांच्या सह अनेक मान्यवर यासाठी आपले योगदान देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मनोगतात स्व. श.मा. पाटील यांचे मित्र कवी राजेंद्र अत्रे यांनी श.मा. पाटील यांच्या महाविद्यालयीन कालावधीपासून साहित्य निर्मिती ते शिवाजी सावंत, मुकुंदराज कुलकर्णी अशा दिग्गज साहित्याकांच्या समवेत सहवास,संभाषणे, विचार मंथन अनुभव कथन केले. त्याचबरोबर प्राचार्य

प्रशांत चौधरी व्यक्त होत असताना जिल्ह्याचे नांव लौकीक करणारे जेष्ठ साहित्यकाचे कोवीड १९ मुळे अकाली निधन झाल्याने साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून  साहित्य सेवेसाठी मी सर्वपरी खात्रीशीर सहकार्य करणार अशी ग्वाही दिली. नातेवाईक धनंजय निंबाळकर यांनीही मनोगत व्यक्त केले श्रध्दांजली वाहून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला या कार्यक्रमास प्रा.अभिमन्यू हंगरगेकर, संग्राम बनसोडे, बाळ पाटील, हनुमंत पडवळ, .प्रा.अरविंद हंगरगेकर,नितीन भन्साळी, चंद्रकांत कारंडे,प्रसाद पाटील, शशीकांत सुर्यवंशी इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाध्यापक शेषनाथ वाघ यांनी केले तर आभार प्रदिप मसे यांनी मानले.

 
Top