तुळजापूर / प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्ह्यात व तुळजापूर तालुक्यात अनेक ठिकाणी बायोडिझेल व त्या सारख्याच इंधनाची राजरोसपणे विक्री होत आहे. या अनाधिकृतपणे विकले जाणाऱ्या बायोडिझेल किंवा त्या सारख्या इंधनामुळे वाहनांचे तर नुकसान होतेच आहे.शिवाय पेट्रोलपंप चालकांचे ही हजारो लिटर विक्रीचे नुकसान होत आहे तरी सदरील अनाधिकृत इंधन विक्री तत्काळ बंद करावी, अन्यथा जिल्ह्यातील व तुळजापूर तालुक्यातील सर्वच पेट्रोल पंपामार्फत तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे तहसीलदार, पोलीस निरीक्षक श्री काशीद यांना आला आहे.
निवेदन देते वेळी तुळजापूर पेट्रोल पंप असोसिएशनचे अध्यक्ष आनंद कंदले, बाबा क्षिरसागर,प्रशांत पाटील ,विष्णू म्हात्रे, उमेश ताकभाते, अँड शैलेश पाठक, ऋषीकेश हंगरगेकर, गोपाळ देशमुख,अनिल खंडागळे, अमित तांबे, शिवाजी सोमाजी, विनोद कोकणे, गौरव जेवळीकर, यश जमदाडे, दत्ता बरबडे, बाबा गाडे सर्व पेट्रोल पंप डिलर्स व सहकारी उपस्थित होते.