तुळजापूर / प्रतिनिधी-

 तिर्थक्षेञ तुळजापूर पंचक्रोषीत अनेक पुरातन प्राचीन पविञ मंदीरे कुंड असुन देखभाल अभावी हे कुंडे  मंदीरे झाडाझुडपात गडप झाली होती. श्रावाणमास पार्श्वभूमीवर श्रीमुदगुलेश्वर सेवा समितीने  येथील अरण्यगोवर्धन मठ पंचक्रोषीत असणाऱ्या  श्री चित्तेश्वर महादेव मंदिराची व सुर्यकुंड चंद्रकुंड परिसराची श्रमदानातुन स्वच्छता  व साफसफाई करण्यात आली. 

यामुळे आता श्रावणमासात प्राचीन अशा चंद्रकुंड  व सुर्यकुंडात स्नान करुन   चित्तेश्वर महादेवाचा  मंदीरात जावुन दर्शन घेणे सुलभ झाल्याने भाविकांनमध्ये आनंदाचे समाधानाचे वातावरण  पसरले आहे.श्री मुद्गलेश्वर महादेव सेवा समिती ,तुळजापूर.यांनी  श्रम दानातुन आजपासुन पंचक्रोषीतील पुरातन मंदीरे कुंड स्वच्छ करण्याच्या कार्यांस शुभारंभ केला आहे. 

 
Top