उस्मानाबाद / प्रतिनिधी-

एका मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाला विशेष सत्र न्यायाधीश एम. एच. मखरे यांनी सहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

अतिरिक्त शासकीय अभियोक्ता महेंद्र देशमुख यांनी सांगितले की, मुलगी उस्मानाबादच्या तेरणा कॉलेजमध्ये ११ वीत शिक्षण घेत असताना सलमान चाँद पठाण (१९, रा. अमृतनगर, उस्मानाबाद) हा दोन-तीन महिन्यापासून तिच्या पाठीमागे येत होता. मुलीने आई, वडील व कॉलेजमधील शिक्षकांना सांगितले. दि. १० सप्टेंबर २०१८ ला रात्री ८ वाजता पीडिता घरी अभ्यास करत असताना सलमान इशारा करून बोलवू लागला. त्यावेळी पीडितेने आईला सांगितले. आईला पाहून तो मुलगा तेथून पळाला. दुसऱ्या दिवशीही असा प्रकार घडल्यावर पीडितेच्या वडिलांनी फिर्याद दिल्यावर आनंदनगर पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. उपविभागीय पोलिस अधिकारी मोतीचंद राठोड यांनी तपास केला. प्रकारणाची सुनावणी विशेष सत्र न्यायाधीश मखरे यांच्या समोर झाली. अभियोग पक्षाच्या वती अॅड. देशमुख यांनी बाजू मांडली. एकूण सात साक्षीदार तपासले. देशमुख यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून सहा महिने शिक्षा सुनावली.

 
Top