परंडा / प्रतिनिधी :- 

परंडा जिल्हा उस्मानाबाद येथील गोपाळ कृष्णाजी कुलकर्णी यांनी शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अधिविभागातून डॉक्टरेट (पीएचडी) पदवी मिळविली आहे. सिंथेसिस अँड  कॅरेक्टरायझेशन ऑफ कॉपोलीमर ऑफ पोलिथायोफिन पोलिपायरोल अँड पोलिथायोफिन पोलिपायरोल कार्बन थीन फिल्म्स फॉर मायक्रोवेव ॲप्लिकेशन हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. त्यांना डॉ. विजया पुरी यांचे मार्गदर्शन लाभले. या संशोधनासाठी त्यांना नवी दिल्ली येथील डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलजी यांच्यातर्फे ज्युनिअर रिसर्च फेलोशिप मिळाली होती.


 
Top