उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हयाचे खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र ५ लाख 32 हजार 739 हेक्टर  हेक्टर आहे. प्रत्यक्षात 5 लाख 36 हजार 664 हेक्टरवर पेरणी झाली आहे.जिल्हयामध्ये सोयाबीन,तूर,उडीद, मूग,खरीप ज्वारी,बाजरी ही खरीप हंगामातील पीके आहेत.  सोयाबीन हे मुख्य पीक आहे.सोयाबीन पीकांची 3 लाख 63 हजार 123 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.सोयाबीन पीक सध्या वाढीच्या आणि फुलोरा अवस्थेत आहे. पिकांची वाढ समाधानकारक आहे.तसेच तूर,उडीद,मूग,बाजरी,खरीप ज्वारी ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. याही पिकांची वाढ समाधानकारक आहे. शेतकरी कीड आणि रोग नियंत्रणाकरीता विविध कीटकनाशकांची फवारणी करत असून फवारणी करताना विषबाधा होऊ नये, म्हणून काळजी घ्यावी,असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ्‍ दिवेगावकर यांनी केले आहे.

 
Top