परंडा / प्रतिनिधी :-

 परंडा तालुक्यातील शेळगांव येथील शेतकऱ्यांना रत्नाई कृषी  महाविद्यालयाच्या ग्रामीण  जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत गिता मोहळकर यांनी माती परीक्षण प्रात्यक्षिक करून  दाखवले. शेतकऱ्यांकडून होत असलेला रासायनिक खतांचा अतिवापर, तणनाशके व  कीटक   नाशकांचा वापर  आणि बारमाही  पिके यामूळे जमिनीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे.शास्त्रीय पद्धतीने माती परीक्षण केल्याने  जमिनीमधील अन्नघटकांचे प्रमाण व जमीनीच्या आरोग्याविषयी माहिती मिळणे शक्य होते.

गिता मोहळकर यांनी शेतकऱ्यांना माती परीक्षणाविषयी  माहिती दिली.कंपोस्ट खते व सेंद्रिय खतांच्या वापरामुळे व तसेच आलटून पालटून पिके घेतल्यास जमीनीचे आरोग्य टिकून राहण्यास मदत होते,असे मोहळकर यांनी सांगितले.

यासाठी त्यांना अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, रत्नाई कृषी महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. डी. पी. कोरटकर, प्राचार्य आर.जी. नलावडे, प्रा.एस.एम. एकतपुरे, प्रा.एस.आर.आडत यांचे मोहळकर यांना मार्गदर्शन लाभले. या प्रसंगी प्रत्रकार-विजय शेवाळे, शेतकरीहनुमंत शेवाळे, कीसन शेवाळे, माधव शेवाळे व महिला आदि इतर शेतकरी उपस्थित होते.


 
Top