तेर / प्रतिनिधी 

 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील राधा गोरोबा गोरे हिने पणजी येथील राष्ट्रीय भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले आहे.

गोवा राज्यातील पणजी येथे युथ स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने सहाव्या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील राधा गोरोबा गोरे हिने १८ वर्षा आतिल वयोगटातील भालाफेक स्पर्धेत ३८.५० मिटर भालाफेक करून भारतात प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक पटकाविले आहे.राधा गोरे हिला युथ स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया संघटनेचे पदाधिकारी दीपक चव्हाण यांच्या हस्ते सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले


 
Top