कळंब / प्रतिनिधी-

कळंब येथे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने व्यर्थ न हो बलिदान,काँग्रेस पक्षाचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन व काँग्रेस पक्षाचे जनसंपर्क अभियान अंतर्गत 15 ऑगस्ट रोजी मोहा रोड रंगिला चौक भव्य कार्यालयाचे ओपनिंग करण्यात आले.गांधी नगर,पुनर्वसन सावरगाव कळंब,बाबा नगर,कल्पना नगर,कळंब येथे युवक कॉग्रेसची शाखेचे उद्दघाटन करण्यात आले.येथे तालुका काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आढावा बैठक व बुथ कमिटीचे नियोजन बैठक घेण्यात आली.

किसान कॉग्रेस च्या तालुकाध्यक्ष विलास करंजकर,कळंब शहराध्यक्ष शिलानंद शिनगारे,शहर कोषाध्यक्ष पदि चंदन विनायकराव भोसले यांची नियुक्ती करण्यात आली .कॉग्रेस विधि व न्याय विभागाच्या तालुकाध्य पदि नितिन अंगरके,भटक्या विमुक्त जाती जमाती शहराध्यक्ष पदि राजेश पुरी,यांच्या नियुक्ती कॉग्रसचे जिल्हाध्यक्ष धिरज पाटील व युवक जिल्हाध्यक्ष शरण पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आल्या.

यावेळी बोलताना उस्मानाबाद  जिल्हा काँग्रेसचे युवक अध्यक्ष शरण पाटील म्हणाले की येणारी कळंब नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने सर्वच्या सर्व जागा जिंकून नगरपरिषदेवर आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी कार्यकर्त्याने आता पासूनच कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले. जी काही ताकद जि प व पं स निवडणुकीत सर्वपरीने पक्ष ताकद देईल अशी हमी यावेळी कार्यकर्यांत्यांच्या बैठकीत दिली.  शहरात समता नगर, पुनर्वसन सावरगाव, गांधीनगर व कल्पना नगर या ठिकाणी काँग्रेस शाखेचे उद्घाटन  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील व युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले . यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज पाटील व युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शरण पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. काँग्रेस पक्षाचे बळकटीकरण करून केंद्रातील मोदी सरकार यांना सत्तेतून बाहेर काढण्यात काँग्रेस पक्ष शहरात व ग्रामीण भागात मजबूत करण्याचे आवाहन धिरज पाटील यांनी केले.जिल्हा कॉग्रेसचे उपाध्यक्ष भागवत धस यांनी शहरामध्ये बुध कमिटी ग्रामिण भागात आपआपल्या गावातील बुध कमिटीची यादि तात्काळ तालुकाध्यक्ष यांच्या जमा करावी असे आवाहन केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर कार्याध्यक्ष सचिन गायकवाड यांनी केले.जिल्हा उपाध्यक्ष दौलतराव माने यांनी कॉग्रेसची व्यर्थ न हो बलिदान या विषयावर कॉग्रेस पक्षाची विचार धारा,युवकांनी अंगीकारावी.असे विचार व्यक्त केले.जिल्हा कॉग्रेस उपाध्यक्ष प्रशांत पाटील,तालुका काँग्रेसचे अध्यक्ष पांडुरंग तात्या कुंभार,जिल्हा संघटक राजेभाऊ शेरखाने,मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे, विधी सेलचे जिल्हाध्यक ॲड विश्वजीत शिंदे,किसान सेलचे जिल्हाध्यक्ष गौरीशंकर मुळे,सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष विलास शाळू,जिल्हा उपाध्यक्ष शंकर नाना करंजकर,माजी तालुकाध्यक्ष दिलीपसिंह देशमुख,जि प सदस्य तांबोळी,ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत,यंग ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रणित डिकले, उस्मानाबाद शहर अध्यक्ष अग्निवेश शिंदे,युवक जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष भूषण देशमुख  विधानसभा अध्यक्ष शशिकांत निरफळ,यांनीही यावेळी आपले विचार  मांडले या कार्यक्रमाला  महिला काँग्रेस जी उपाध्यक्ष जोती सपाटे भोसले मॅडम सोदागर मॅडम धावरे मॅडम  मांडले.सुभाष लाटे,ॲड भारत लोमटे,माजी तालुकाध्यक्ष मागासवर्ग शहर अध्यक्ष बबन होसलामाल अँड प्रताप सोनटक्के,अँड खुने साहेब,मागास्वर्गीय तालुकाध्यक्ष अजित खलसे,कमलाकर पाटील,अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष शहाजान संपादक प्रभाकर लोंढे मायकल साहेब  शिकलगार, शहाजी मडके मडके सर मोह राजाभाऊ गिरी  रशीद शेख वसंत गायकवाड शहाजी रितापुरे,नारायण दशवंत,बाळासाहेब महाजन,अंतराव घोगरे,अँड राहुल लोखंडे,रोहन कुंभार,नासार शेख,रोहित कसबे,अमीर सौदागर,गोविंद तांबोळी, हरी जाधव,भीमराव कुचेकर,सुभाष वाघमारे,संजय पवार,फायाज मनियार ,समीर सौदागर, राहुल खैरमोडे ,रफिक तांबोळी, सुभाष वाघमारे आदींसह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक भातलवंडे व ॲड भारत लोमटे यांनी केले. तर आभार जिल्हा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष आप्पासाहेब शेळके यांनी मानले.


 
Top