उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे  यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेले शिवसंपर्क अभियान उस्मानाबाद तालुक्यातील पाडोळी (आ), समुद्रवाणी, कोंड, दाऊतपुर, तेर, खेड पंचायत समिती गणात राबविण्यात आले. यावेळी शिवसैनिक, युवासैनिक, ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या.नेतृत्व निर्माण करण्याचे ताकद व विचार फक्त शिवसेनेत आहे, असे प्रतिपादन आ.कैलास पाटील यांनी केले

शिवसैनिकांच्या परिश्रमानेच शिवसेना महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष आहे. नेतृत्व गुण निर्माण करण्याची ताकत ही फक्त शिवसेनेच्या विचारात आहे. हा पक्ष तरुणांचा पक्ष आहे, तरुणांच्या रक्तामध्ये विचार रुजविण्याचे काम हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी केलेले आहे.

शिवसेनाप्रमुखांनी कार्यकर्त्यांना शिवसैनिक ही पदवी दिलेली आहे, त्याचे कारण म्हणजे सैनिक हा २४ तास तत्पर असतो, बाळासाहेब नेहमी सांगायचे पदे येतात आणि जातात पण शिवसैनिक हे पद कायम राहते, त्यामुळे सर्व शिवसैनिकांनी पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून अमलात आणलेल्या योजनांचा लाभ सर्व सामान्य नागरिकांना मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी कायम तत्पर रहावे, कोविड १९ च्या अनुषंगाने राबविण्यात येत असलेल्या लसीकरण मोहिमेत सहभागी होण्यासाठी सर्व नागरिकांना प्रेरित करावे, असे आवाहन आ. कैलास पाटील यांनी केले.

यावेळी उपजिल्हाप्रमुख विजय बापू सस्ते, तालुकाप्रमुख सतीश सोमाणी, माजी तालुकाप्रमुख दिलीप जावळे, तालुका सचिव गुरू गवळी, वडगाव विभागप्रमुख अमोल मुळे ,सौदागर जगताप, विभागप्रमुख राजेंद्र भांगे,तेर विभाग प्रमुख अनंत भक्ते, सरपंच सुनील गरड, रवी कोरे, काका शिनगारे,  राजेंद्र भांगे, बापू ढोरमारे,  दादा शिराळ, व्यंकट भाऊ गुंड, युवासेना गटप्रमुख ओंकार आगळे, गणप्रमुख समाधान जाधव, विकास जाधव, सरपंच रामभाऊ गव्हाणे, सरपंच राजाभाऊ पुदाले, मा. सरपंच मुन्ना खटावकर, अविनाश इंगळे, विशाल कदम, आशिष वाटवडे, शाखाप्रमुख राजेंद्र झिरमिरे, अक्षय बोचरे, सतीश जावळे, कुंडलिक लांडगे,नामदेव कांबळे, पोपट जाधव, मुसेब काझी, बालाजी गुंड, अतिक सय्यद, अविनाश आगाशे, सुरेश पोळ, महादेव गाढवे, अजिंक्य बोराळे, कृष्णा कन्हेरे, रोहन वाघ, विजयकुमार मुळे, मदन उंबरे, मुकुंद उंबरे, अमोल थोडसरे, उत्तम बोचरे, हनुमंत शेंडगे, पद्माकर एकंडे, संजय पवार, राजकुमार झिरमिरे,  सुनील एकंडे, ऋषी राऊत, संतोष देटे, गणेश नाईक, अतुल दळवे, दादा जाधव, देवराज पवार यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.


 
Top