तुळजापूर / प्रतिनिधी- 

 तुळजापूर कृषि विज्ञान केंद्रात स्वयंचलित कृषि हवामान यंत्र कार्यान्वित प्रत्येक १५ मिनिटांनी संकलित होणार उस्मानाबाद जिल्ह्यातील हवामान घटकांची आकडेवारी भारतीय हवामान विभागाकडून ( India Meteorological Department ) तुळजापूर येथील कृषि विज्ञान केंद्रांतर्गत जिल्हा कृषि हवामान केंद्रामध्ये स्वयंचलित कृषि हवामान यंत्र बसविले आहे .

 त्यामुळे शेतकऱ्यांना हवामानावर आधारित शेती व शेतीचे सुयोग्य व्यवस्थापन करणे सहज शक्य होणार आहे . भारतीय हवामान विभाग आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषद , नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण कृषि मौसम सेवा अंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ , परभणी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र , तुळजापूर येथील जिल्हा कृषि हवामान केंद्र मागील दोन वर्षापासून कार्यरत असून या केंद्रामार्फत जिल्ह्यातील जवळपास तीस ते चाळीस हजार शेतकऱ्यांना व्हॉट्सअॅप व इतर माध्यमांतून प्रत्येक मंगळवार व शुक्रवारी जिल्हा व तालुकानिहाय हवामानाचा अंदाज व कृषि सल्ला देण्यात येतो .   स्वयंचलित कृषि हवामान केंद्रातून मिळणाऱ्या हवामान घटकांची अद्यावत माहिती व जिल्हा कृषि हवामान केंद्रातर्फे पुरविण्यात येणारा हवामान अंदाज व कृषि सल्ला पत्रिकेद्वारे वाणांच्या निवडीपासून ते काढणी पश्च्यात नियोजन हे कृषि विज्ञान केंद्रातील तज्ञांद्वारे दिला जाणाऱ्या सल्यामुळे शेतकरी बांधवांना पिकांचे सुयोग्य नियोजन करण्यास मोलाचे ठरणार आहे, अशी माहिती डॉ . नकुल हरवाडीकर , विषय विशेषज्ञ ( कृषि हवामानशास्त्र ) व श्री . शिवराज रुपनर , कृषि हवामान निरीक्षक यांनी दिली आहे


 
Top