उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद  तहसील कार्यालय अन्नपुरवठा विभाग यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये उस्मानाबाद शहरातील उत्कृष्ट स्वस्त धान्य दुकानदार म्हणुन श्री बालाजी उर्फ राजाभाऊ पवार यांचा जिल्हाधिकारी डॉ कौस्तुभ दिवेगावकर  व  उस्मानाबाद- कळंब मतदार संघाचे आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख श्री कैलास दादा पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

यावेळी  एसडी,  डीएचओ,  चारूशिला देशमुख  , तहसीलदार  गणेश माळी  , नायब तहसीलदार श्री राजाराम केरुकर  ,  पुरवठा विभाग कर्मचारी, शहरातील सर्व सहकारी स्वस्त धान्य दुकानदार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी तहसील कार्यालयाच्या माध्यमातून नुतन शिधापत्रिका, दुय्यम शिधापत्रिका, शिधापत्रिकेतून नाव कमी करणे,अथवा नविन सामावेश करणे, महात्मा फुले जन आरोग्य प्रमाण पत्र वितरित करणे आदी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

 
Top