उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरातील समता चौक  येथे आज दि. ०९ अॉगस्ट रोजी दुपारी २:०० वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन मराठवाडा अध्यक्ष मा. गजानन बंगाळे पाटील यांच्या हस्ते झाले. 

 या वेळी गजानन बंगाळे पाटील, रविंद्र इंगळे, तानाजी पाटील, ॲड. विजय जाधव, बिभीषण भैरट,  धर्मराज पाटील, धनंजय पेंदे, अमृत भोरे विष्णुदास काळे,भाऊसाहेब मुंडे,  शंकर घोगरे, गुरु भोजने व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी येणाऱ्या पुढिल काळात मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासंदर्भात पूर्ण ताकतीने लढा उभा करण्याचा निर्धार करण्यात आला. या कार्यालयाच्यामाध्यमातून जिल्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडून, ते प्रश्न सोडवण्यासाठी उपयोग होईल असा विश्वास रवींद्र ईंगळे यांनी आपल्या भाषणादरम्याण व्यक्त केला.

 
Top