उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तु आमच्या नेत्याला या रस्त्यासंदर्भात सारखे-सारखे का प्रश्न विचारतोस , असे म्हणत आपल्याला दोन ते तीन अनओळखी व्यक्तीने मारहाण केल्याची फिर्याद जिजाऊ चौक ते बोंबले हानुमान रस्त्याच्या उपोषण करणारे अभिजीत पतंगे  यांनी आनंदनगर पोलिस ठाण्यात दिली आहे. या फिर्यादी नुसार आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, जिजाऊ चौक ते बोबले हनुमान रस्त्याची अत्यंत दैयनींय अवस्था झालेली होती. लोकांनी वारंवार मागणी करून देखील रस्त्याची दुरूस्ती किंवा नव्याने रस्ता केला जात नव्हता, अखेर अामदार कैलास पाटील यांनी या रस्त्यासाठी निधी आणला.राज्य सरकार ने जाहीर केलेल्या आंडरग्राऊड ड्रेनेजसाठी व रस्त्याचे काम कोन करायचे यामुळे काम रखडले होते. यावरून या भागातील रहिवाशी अभिजीत पतंगे याने रस्त्याचे काम त्वरीत सुरू करावे या मागणीसाठी अमरण उपोषण सुरू केले होते. त्यानंतर नगराध्यक्षांनी रस्त्याची दुरूस्ती त्वरीत करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर उपोषण सोडण्यात आले होते. 

दि. ६ ऑगस्ट रोजी संध्याकाळी अभिजीत पतंगे यास मोबाईल फोन वरून जिजाऊ चौकात बोलाविण्यात आले. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या एकाने मी तुला फोन करून बोलावले होते. तु आमच्या नेत्याला सारखे-सारखे प्रश्न का विचारतोस, असे म्हणत स्वीट मार्ट मधील काचेची भरणी डोक्यात मारली आहे. त्याच प्रमाणे कत्तीने मारण्याचा प्रयत्न केला असता तो हुकविण्यात आला, असेही फिर्यादीत सांगितले आहे. या प्रकरणी आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 
Top