उमरगा / प्रतिनिधी-

तालुक्यातील आष्टा जहागीर येथील विवाहित महिलेचा सासरच्या मंडळींनी पाच लाख हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी कुर्डुवाडी येथील येथील पाच व लातूर येथील चार अशा नऊ जणांवर शुक्रवारी (ता.सहा) रात्री उमरगा पोलिसात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आष्टा (जहागीर) येथील मुलीचा कुर्डुवाडी येथील अमोल यांच्याशी बारा एप्रिला २०१९ रोजी रीतीरिवाजा प्रमाणे लग्न झाले होते. लग्नानंतर विवाहित महिला कुर्डुवाडी येथे सासरी नांदण्यास गेली असता पती अमोल सिद्राम कांबळे रा. कुर्डूवाडी (ता.माढा)  यांनी माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून त्रास देऊ लागला.   माझ्या कामात काहीही चूक नसताना पतीकडून नेहमी त्रास सुरू होता.  तुझ्या आई वडिलांनी मला हुंडा दिला नाही, मी मोठ्या पदावर नोकरीला आहे. माझा मान पान राखला नाही, तू माहेरून पाच लाख रुपये हुंडा घेऊन ये असे म्हणून शिवीगाळ करून मारहाण करीत असत. या प्रकरणी पती अमोल, सासू वच्छला, दीर रजनीकांत कांबळे,  नणंद अनिता संघर्ष माने व तिचा पती संघर्ष बब्रुवान माने रा. सर्वजण कुर्डूवाडी यांनी पाच लाख हुंड्यासाठी त्रास दिला. या संदर्भात महिलेच्या तक्रारीनुसार  पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 
Top