तुळजापूर / प्रतिनिधी-

 महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मंदीर समोर भारतीय जनता पार्टी  वतीने  मंदीर उघडण्याच्या प्रमुख मागणीसाठी  आमदार  श्री.राणाजगजितसिंह  पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली   सोमवार दि .30 रोजी  भरपावसात   संभळ,हलगी  कडकडाटात  काळी गुढी उभारुन शंखनाद आंदोलन  करण्यात आले.यावेळी  ठाकरे सरकारच्या निषेधाचा घोषणा देऊन  हे सरकार गोरगरिबांच्या विरोधात आहे, असा आरोप करून  लवकरात लवकर मंदिर उघडावे अथवा भाजपाकडून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळेस देण्यात आला.

या आंदोलनात  नगराध्यक्ष सचिन रोचकरी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह निंबाळकर,  आनंद कंदले,    नारायण नन्नवरे ,

महिला आघाडीच्या  देवकन्या गाडे, सुहास साळुंखे, गिरीष देवळालकर,   शांताराम पेंदे ,विकास मलबा,गुलचंद व्यवहारे बाळासाहेब भोसले, शामराज,शिवाजी बोधले,प्रसाद पानपुडे, सागर कदम, उमेश गवते,सागर कदम,सागर पारड आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी , कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता.  प्रारंभी राजाभाऊ गायकवाड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह संभळ वाजवत महाआघाडी सरकारचा निषेध केला.

 
Top