तेर / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्हा परीषदेच्या  माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी उस्मानाबाद तालुक्यातील काजळा  येथे विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी  अर्चनाताई पाटील यांनी  नागरिकांशी संवाद साधून  सार्वजनिक अडचणी जाणून घेतल्या.यावेळी  नागरिकांनी गावातील पाणी पुरवठ्याचा  लागणारा स्रोत बदलून देण्याची प्रमुख मागणी केली.  काजळा ते दारफळ या  शेतरस्त्याची मागणी करण्यात आली. या मागणीचा सकारात्मक पाठपुरावा करून लवकरच कामे मार्गी लावण्यात येतील.उर्वरित विकास कामांना देखील निधी उपलब्ध करुन देण्यात येईल अशी ग्वाही पाटील यांनी दिली .

आ. राणाजगजितसिंह पाटील  यांच्या माध्यमातून काजळा गावास भरघोस निधी प्राप्त झाला. काही दिवसांपूर्वी या विकासकामांचे भूमिपूजन देखील करण्यात आले. त्याबद्दल गावकऱ्यांनी आ.राणाजगजितसिंह पाटील व अर्चनाताई  पाटील यांचे आभार व्यक्त केले. उर्वरीत विकास कामांना देखील निधी उपलब्ध करून येणार असल्याचे  अर्चनाताई पाटील यांनी सांगितले.यावेळी गावातील जेष्ठ नेते विष्णुदास आहेर, सरपंच प्रवीण पाटील, उपसरपंच जिजाबाई मडके,  अभिमन्यू शितोळे  ,.सोमनाथ पवार, .रामचंद्र कदम, .राजाभाऊ पवार, .बालाजी पाटील, . बप्पा शेळके, .शुभम शिंदे, .दिपक हाजगुडे , किशोर लिंगे यांच्यासह गावातील कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top