परंडा / प्रतिनिधी : - 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत सौ. के. एस. के. ऊर्फ काकू कृषी महाविद्यालय बीड येथील व परंडा येथील कृषीदूत क्षीरसागर अभिषेक बाबासाहेब याने कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे शेतकरयांनी आपला शेतीमाल आँनलाईन  पद्धतीने कशा प्रकारे विकता येईल या विषयी परंडा तालुक्यातील बावची गावात ग्रामीण जागरूकता कृषि कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत  शेतकऱ्यांना शेतीमालाची विक्री करण्यासाठी विविध मोबाईल ॲपचे वापर व त्याचे फायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. 

  यामध्ये ई-नाम, अग्रिमेडिया, ईफको किसान, भारतऍग्री या ॲपचा  वापर करून कशा प्रकारे शेतकरी माल खरेदी-विक्री करू शकेल याविषयी सविस्तर क्सा क्षिरसागर अभिषेक बाबासाहेब हे बावची गावात शेतकऱ्यांना देत आहे. यामध्ये शेतकर्यांचे आँनलाईन खरेदी-विक्री विषयी असलेला संभ्रम दूर करून त्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होईल, ई-लिलाव कसा केला जातो, व्यापारी कशा प्रकारे माल खरेदी करतात, विकलेल्या मालाचे पैसे शेतकर्यांना त्यांच्या खात्यावर कसे जमा केले जातात.हे ई-नाम ॲप प्ले स्टोअर मध्ये कसे डाऊनलोड करावे तसेच कसं वापरावे याबद्दल सांगितले आणि ते कृतीतून करूनही दाखवले. यासाठी त्यांना कृषि अर्थशास्त्र विभागाचे विषयतज्ञ प्रा.डि.एस.जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

 ग्रामीण जागरूकता कृषि कार्यानुभव कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी  सौ. के. एस. के. ऊर्फ काकू कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.शिंदे, ग्रामीण जागरूकता कार्यक्रमाचे प्रभारी प्रा.बी.डी.तायडे, डॉ.मोरे सर, डॉ.चव्हाण मॅडम, प्रा. एस. पी.शिंदे सर, प्रा. एस.टी.शिंदे सर,प्रा.बी.बी.तांबोळकर सर,प्रा.बी.आर.चादर मॅडम,प्रा.एस.व्ही.राठोड सर,प्रा.एस.एस.राठोड, प्रा. पी. बी. मांजरे सर, प्रा.बी.डी.बामणे सर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. या प्रात्यक्षिकातुन मिळालेल्या माहिती बद्दल बावची गावातील शेतकरयांनी समाधान व्यक्त केले. 

 
Top