उमरगा / प्रतिनिधी : -

भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन  कैलास शिंदे यांचा वाढदिवस भाजपाच्या वतीने गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, गरीब व गरजू महिलांना साड्या वाटप, वृक्षलागवड, रुग्णांना फळवाटप आदी विविध सामाजिक उपक्रम घेवुन साजरा करण्यात आला. 

जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे  यांच्या वाढदिवसानिमित्त १५ ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टी व कैलासदादा युवा मंच लोहारा तालुक्याचे वतीने गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तर उमरगा तालुक्यात वृक्षलागवड, रुग्णांना फळवाटप, अन्नदान आदी कार्यक्रमांने वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी विविध राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी श्री शिंदे यांना प्रत्यक्ष भेटून अभिष्टचिंतन केले. यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य संताजी चालुक्य, बाबुराव स्वामी, माधव पवार, नितीन होळे, प्रविण स्वामी, संजय ढोणे, सरचिटणीस सिद्धेश्वर माने, अभिषेक पवार, पप्पु स्वामी, विठ्ठल चिकुंद्रे, देविदास चव्हाण, शिवाजी सुरवसे, एस पी कांबळे, प्रदिप सांगवे, गणेश डोंगरे, उमेश कारडामे, भाजपा लोहारा तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेट्टी, राजेंद्र पाटील, पंस सदस्य वामन डावरे, तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे, सुभाष गिरी, बालाजी चव्हाण, दगडु तिगाडे,  इकबाल मुल्ला, माणिक तिगाडे, विजय महानुर, बाबा सुंबेकर, बालासिंग बायस, काशीनाथ घोडके, सुमित झिंगाडे, अशोक तिगाडे, तुकाराम विराेधे, दादा काळे, सदाम सुंबेकर, अब्बास शेख, गणी शेख, लक्ष्मण भाेरे, मनिषा महानुर, जयश्री लांडगे, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते माेठया संख्येने उपस्थित हाेते.

 
Top