परंडा / प्रतिनिधी :- 

स्वातंत्र्य मिळविण्यासाठी देशातील अनेक लोकांना स्वतःचे बलिदान द्यावे लागले त्यामुळेच आपला भारत देश स्वतंत्र झाला आहे असे प्रतिपादन शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.दीपा सावळे यांनी सोमवार दि.९ रोजी क्रांती दिना निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात अध्यक्ष समारोप करताना केले.  

सांस्कृतिक विभागाच्या आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमानाने महाविद्यालयात क्रांती दिन कार्यक्रम आयोजित केला होता.या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून दीपक ओव्हाळ  उपस्थित होते.व्यासपीठावर आय क्यु ए सी चे चेअरमन डॉ.महेशकुमार माने, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.शहाजी चंदनशिवे उपस्थित होते. 

 यावेळी महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी कोव्हीड -१९ चे पालन करत उपस्थित होते. पुढे बोलताना दीपक ओव्हाळ म्हणाले की स्वातंत्र्य चळवळीमध्ये महिलांचे अतुलनीय योगदान आहे. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारी महिलांच्या कार्यावर  प्रकाश टाकण्यात आला.छोडो भारत, करेंगे या मरेंगे हा मंत्र गांधींनी जनतेला ९ ऑगस्ट १९४२ ला  दिला होता. त्याचेच विस्तारित रूप म्हणजे ऑगस्ट क्रांती दिन होय असे त्यांनी यावेळी सांगितले . 

  अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्या डॉ.दीपा सावळे म्हणाले की क्रांती म्हणजे बदल महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य प्राप्त केले .  महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलन केले ,चले जाव चा नारा दिला, भारतीयांच्या जीवनातील क्रांती दिन हा महान दिवस आहे.यानंतर अनेक चळवळी तयार झाल्या भारतातील लोक रस्त्यावर उतरले. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी चा कालावधी होता तेव्हा अनेक लोकांनी बलिदान दिले आणि १५ऑगस्ट रोजी महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली देशाला स्वातंत्र्य मिळाले.कार्यक्रमाचे आभार डॉ.सचिन चव्हाण यांनी मानले.


 
Top