उस्मानाबाद / प्रतिनिधी-

आपल्या हाऊसचे होम करता यावे, यासाठी वृक्षसंवर्धन करणे म्हणजेच आपल्या सर्वांच्या जीवनाची हमी आहे. त्यालाच प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता महिला मोर्चाने उस्मानाबाद शहरात माझे घर माझी बाग ही स्पर्धा आयोजित केली असून, या स्पर्धेत सहभागी हाेण्याचे अावाहन करण्यात अाले आहे.

आपल्या घराला बाल्कनी किंवा व्हरांडा असेल तर आपण त्याचा उपयोग कुंड्यातून सुंदर फुलझाडे तसेच दैनंदिन वापरासाठी (स्वयंपाकघरासाठी) लागणारी किंवा औषधी वनस्पती ठेवू शकतो. घर सजविण्यासाठी आपण कुंड्यातील झाडे ठेवतो. छोट्याला जागेला सुंदर रूप देण्यासाठी अर्थातच झाडांची निवड अतिशय महत्त्वाची आहे. कारण आपल्याकडे जागा थोडी आहे. त्यामुळे मोजक्याच वनस्पती आपण ठेवू शकतो. शिवाय व्हरांड्यामधला भाग सहसा मोकळा ठेवतो. कारण तिथेच उभे राहून आपण बाहेरचे जग बघतो. त्यामुळे व्हरांड्याच्या आकारमानानुसार एक किंवा दोन कोपरे कुंड्या ठेवण्यासाठी उपयोगात येतात. पद्धतीची माहिती भाजप महिला मोर्चाच्या अर्चना अंबुरे यांनी यावेळी सांगितली. स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच उत्तेजनार्थ पारितोषिके व रक्कम देण्यात येणार असल्याने माझे घर, माझी बाग, या स्पर्धेत जास्तीत जास्त जणांनी सहभागी होण्याचे आवाहन भाजप महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे. स्पर्धकांनी ५ सप्टेंबरच्या आत नोंदणी करणे आवश्यक असून, त्यासाठी खालील व्हॉटसअप नंबरवर (संपर्क:-९४०४६७६४६३ किंवा ८८३०६६५१३३) पत्ता व बागेचा फोटो टाकावा, असे अावाहन करण्यात अाले अाहे.


 
Top