तुळजापूर / प्रतिनिधी

जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या निर्देशानुसार पुरवठा विभागाच्या वतीने तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांच्या जीर्ण शिधापत्रिका बदलून देणे, विभक्त शिधापत्रिका देणे, शिधापत्रिकेतील नाव कमी करणे, नाव समाविष्ट करणे आदी कामासाठी तालुक्यात मंडळ निहाय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पुरवठा अधिकारी संदीप जाधव यांनी दिली आहे.

तुळजापूर मंडळा अंतर्गत येणार्या गावासाठी १६ ऑगस्ट २०२१ ते १७ ते ऑगस्ट २०२१ रोजी पंचायत समिती सभागृह तुळजापूर येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंगरूळ मंडळ अंतर्गत येणार्या गावासाठी अर्ज १८ ऑगस्ट २०२१ ते १९ ऑगस्ट २०२१ रोजी ठिकाण मंडळ अधिकारी कार्यालय मंगरूळ येथे शिबिराचे आयोजन केले आहे. २० ऑगस्ट २०२१ ते २१ ऑगस्ट रोजी मंडळ अधिकारी कार्यालय सावरगाव येथे शिबिराचे आयोजन केले आहे. २२ ऑगस्ट २०२१ ते २३ ऑगस्ट २०२१ रोजी मंडळ अधिकारी कार्यालय नळदुर्ग येथे शिबिराचे आयोजन केले आहे. तर जळकोट मंडळातील गावातील अर्ज स्वीकारण्यासाठी २४ ऑगस्ट २०२१ ते २५ ऑगस्ट २०२१ रोजी मंडळ अधिकारी कार्यालय जळकोट येथे शिबिराचे आयोजन केले आहे. सलगरा दि. मंडळांतर्गत येणार्या गावातील अर्ज स्वीकारण्यासाठी २६ ऑगस्ट २०२१ ते २७ ऑगस्ट २०२१ रोजी मंडळाधिकारी कार्यालय सलगरा दि येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ईटकळ मंडळा अंतर्गत येणाऱ्या सज्जातील शिधापत्रिकाधारकांचे अर्ज स्वीकारण्यासाठी २८ ऑगस्ट २०२१ ते २९ ऑगस्ट २०२१ रोजी मंडळाधिकारी कार्यालय इटकळ येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.


 
Top