परंडा / प्रतिनिधी : -

पद्मश्री पोपटराव पवार यांची प्रहार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना उस्मानाबाद शिष्टमंडळाने भेट घेऊन सामाजिक व शैक्षणिक कार्या बद्दल त्यांचे विचार जाणून घेतले.

“दुष्काळ ते हरित गाव” हिवरेबाजार या गावासाठी पहिला ग्राम निर्मल पुरस्कार १९९५ साली मिळाला तर महाराष्ट्रातील तिघांना पद्मश्री पुरस्कार मिळाला त्यातील एक महान व्यक्ती म्हणजे पोपटराव पवार होत.     शैक्षणिक,सामाजिक चळवळ किंवा संघटना चालविण्यासाठी त्यांचे अनुभव त्यांनी आमच्या सोबत शेअर केले.कोणतीही चळवळ, संघटना चालवताना एकटे चालू नये, सगळ्यांना सोबत घेऊनच चालावे नाहीतर एकटाच चालतो आपल्याला विचारत नाही असा गैरसमज टीम मध्ये होतो म्हणून सर्वांना सोबत घेऊन चालावे व कामात सातत्य टिकवले पाहिजे, भरल्या पोटाची कामे करत असताना आपल्या आजूबाजूला असणा-या उपास पोटी लोकांकडे पाहिले पाहिजे, गोरगरीब गरजू होतकरू, रंजल्या गांजलेल्यांसाठी तळमळीने पोटतिडकीने सेवाभाव मनात ठेवून सामाजिक बांधिलकी जोपासत पुढे गेलं पाहिजे असे भेटी अंती मार्गदशन केले.तसेच प्रहार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने आजवर केलेल्या सामाजिक कामाची माहिती त्यांना दिली.सामाजिक काम ऐकून त्यांनी समाधान व्यक्त केले, प्रहार शिक्षक संघटनेचे मनोमन कौतुक आणि अभिनंदन केले.

समविचारी शिक्षक मावळे एकत्र करा, व्यसनापासून दूर राहा, यशानं हुरूळून जायचं नाही,जमीनीवरच पाय असावेत असा संदेश त्यांनी प्रहार शिक्षक शिष्टमंडळाला दिला.   याप्रसंगी पद्मश्री पोपटराव पवार यांचा बुके देऊन सत्कार केला.शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष वैजीनाथ सावंत,परंडा तालुका उपाध्यक्ष शहाजी झगडे, तालुका नेते लक्ष्मण औताडे,रेवण वायफळकर आदि उपस्थित होते.

 
Top