तुळजापूर / प्रतिनिधी-

 शासनाच्या विविध योजना गावपतळीवर पोहचवा अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा जिपचे उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी गुरुवार दि.२६रोजी  तुळजापूर पंचायत समिती येथे पंचायत समितीत घेण्यात आलेल्या  आढावा बैठकीत दिला .

सदर बैठकीत  पाणीपुरवठा, जलसंधारण, बांधकाम   ,आरोग्यविभाग. शिक्षण विभाग. कृषी विभाग .व शेत रस्ते व गाय गोठा प्रस्ताव अदि विषयावर सविस्तर चर्चा  करण्यात  आली. तसेच सर्वसामान्य  जनतेसाठी विविध योजना गावपातळीवर पोचविण्याचे आदेश ग्रामसेवक व संबंधित अधिकाऱ्यांना दिले अंमलबजावणी नाही झाली तर पुढील आढावा बैठकीत कारवाई केली जाईल असा इशारा या बैठकीत  दिला.

 सदरील बैठकीस सर्व अधिकारी  संपर्क प्रमुख अनिल  खोचरे, पंचायत समिती सभापती रेणुका इंगोले, श्याम पवार सुधिर  कदम, अमीर शेख,  सुनील जाधव , संजय भोसले, राहित चव्हाण, प्रदीप मगर, उपशहर नाईकवाडी , दिनेश रसाळ,   प्रतीक रोचकरी,  चेतन बंडगर,  बालाजी पांचाळ , अनिल भोपळे, महेंद्र सुरवसे ,अनिल छाञे, सिद्धाराम कारभारी तसेच जयप्रकाश दरेकर, कृष्णा दरेकर, दादाराव पारवे, सौदागर साप्ते,  बालाजी डांगे, नेताजी पवार, जय मार्कंड,  कृष्णाथ मोरे , ज्ञानेश्वर भोसले, शिवाजी कामे, अमोल गवळी,  सचिन देशमुख, राजेंद्र महाराज, नानाजी कारभारी, कालिदास सुरवसे आदी शिवसैनिक उपस्थित होते. 

 
Top