तुळजापूर / प्रतिनिधी-

तालुक्यातील काटगाव ते नॅशनल हायवे हा आठ किलोमीटर  रस्ता  पैकी अर्धवट रस्ता तयार केला असुन करण्यात आलेला रस्तावार सध्या खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाल्याने या रस्त्याची गुणनियञंक पथकामार्फत तपासणी करुन दोषीवर कारवाई करण्याची मागणी ञस्त ग्रामस्थांन मधुन केली जात आहे. 

काटगाव ते नँशनल हायवे हा   8 किलोमिटरचा रस्ता असुन हा रस्ता अर्धवट केला गेला आहे. जो झालेला रस्ता आहे. त्याची दुरावस्था झाली आहे. सध्य स्थितीत  या  रस्त्यात खड्डा आहे की,  खड्यात रस्ता आहे हे देखील कळत नाही या रस्त्यावरून तीन ते चार  गावाचा सोलापूर , नळदुर्ग अशा  शहराशी संपर्क  होतो. त्यामुळे यावरु मोठ्या प्रमाणात वाहतुक  असते . 

सदरील गाव हे मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राचा सरहद्द वरील शेवटचे गाव असल्याने येथे विकास कामांन बाबतीत दर्जा न राखता काम कसेबसे उरकुले जाते. यात ठेकेदार व संबंधित इंजिनियर माञ आपले उखळ.पांढरे करुन घेत असल्याने यातील दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. कारवाई न केल्यास या मार्गावरुन येजा करणाऱ्या तीन चार गावचे ग्रामस्थ आंदोलन करण्याचा पाविञ्यात  आहेत .

 
Top