उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पीकविमा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने कृषी विभागाचा नुकसानीबाबतचा अहवाल ग्राह्य धरण्याचे मान्य केल्याने आता उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व बाधित (कृषी खात्याच्या अहवालानुसार ५०% पेक्षा जास्त नुकसान झालेल्या) महसुली मंडळातील शेतकऱ्यांना २५% अग्रीम रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. 

 स्थानिक विमा कंपनीचे प्रतिनिधी यांनी पीक नुकसानीच्या अहवालावर सुरुवातीला सही करण्यास नकार दिला होता. तद्नंतर आपल्या सर्वांच्या रेट्याने स्वाक्षरी केली, परंतु नुकसान ५०% च्या आत आहे असे लिहून खोडा घातला होता. कालच्या बातमीनंतर हे विमा प्रतिनिधी कृषी क्षेत्रातले तज्ञ नाहीत हे प्रखरपणे लक्षात आणून दिल्यानंतर विमा कंपनीच्या वरिष्ठाने नुकसानीच्या बाबत आपले म्हणणे बाजूला ठेवत कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार ५०% पेक्षा जास्त नुकसान झाले आहे हे मान्य करण्याचा शब्द दिला आहे. हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये ५०% पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर नुकसान भरपाईच्या प्रमाणात विमाधारक शेतकऱ्यांना २५% मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देण्यात येते. ही रक्कम एक महिन्याच्या आत म्हणजे सप्टेंबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करून घेण्यासाठी आपण ताकदीने प्रयत्न करू.

 
Top