तुळजापूर / प्रतिनिधी- 

उस्मानाबाद जिल्हयातील तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथे (ता. तुळजापूर) येथे शिवअल्पसंख्याकसेनेच्या प्रथम शाखेच्या उद्घाटन व शेकडो मुस्लीमांचा शिवसेना प्रवेश सोहळ्यात रविवार दि.२२ रोजी संपन्न झाला.

 प्रारंभी  खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर  शिवसेना  जिल्हाप्रमुख आमदार कैलास दादा पाटील यांच्या हस्ते व शिव अल्पसंख्यांक सेनेचे जिल्हाप्रमुख अमीर भाई शेख यांच्या उपस्थितीत काटगाव येथील  शेकडो मुस्लिम  बांधवांनी शिवसेनेच्या  शिव अल्पसंख्यांक सेनेत जाहीर प्रवेश केला. त्यानंतर  शिव अल्पसंख्यांक सेनेची जिल्ह्यातील पहिली शाखा स्थापन करण्यात आली.

 यावेळी महिला जिल्हाप्रमुख श्यामल ताई वडणे ,  युवा सेना तालुका प्रमुख प्रतीक बाप्पा रोचकरी,  धुळप्पा रक्षे , सतीश गिराम , आप्पा गिराम , ज्येष्ठ शिवसैनिक समीर भाई पटेल , अर्जुन आप्पा , चेतन बंडगर नुकतीच ज्यांची शिव अल्पसंख्यांक सेनेच्या तालुका   उपाध्यक्ष पदी निवड झाली असे इमाम शेख , नूतन तालुका  सरचिटणीस समीर शेख , सैफान डॉन शेख , इस्माईल टेलर , शिव अल्पसंख्यांक सेनेचे कट गावचे नूतन शाखाप्रमुख सद्दाम शेख , उपप्रमुख इस्माईल इनामदार , सचिव जुबेर शेख , अब्दुल खताळ , सलीम शेख , सरदार घाटवाले , रोप पटेल , शब्बीर खताळ , रफिक हिपळे , नवाज तालीकोटे , अझर शेख , सलीम मुलानी , शकील गवंडी , नयुम शेख ,  अल्ताफ खताळ, अल्ताफ मुजावर, सरदार घाट वाले  या प्रमुख कार्यकर्त्यांसह शेकडो मुस्लिम बांधवांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला .यावेळी काटगाव विभागातील शिवसैनिक मोठ्या संखेने उपस्थितीत होते.


 
Top