तुळजापूर / प्रतिनिधी

 नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग रचना करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने निर्देश दिल्याने राज्यात बहुचर्चित असलेल्या तिर्थक्षेञ तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीची प्रशासकीय ,पक्ष व वैयक्तिक पातळीवर  निवडणुक पुर्वतयारीस आरंभ झाला आहे.

तिर्थक्षेञ तुळजापूर नगरपरिषदची स्थापना १९५२ ला होवुन प्रथम निवडणूक १९५२ साली झाली तेव्हा पासुन  सलग ५० वर्ष या नगरपरिषदवर धार्मिक तिर्थक्षेञ असुन ही येथे कम्युनिस्ट विचार सरणी असलेल्या  शेकापची एक हाती  ही सत्ता होती.  2011ला  राष्ट्रवादी काँग्रेस ने २० च्या २० नगरसेवक निवडुन आणुन शेकापची एकहाती सत्ता संपुष्टात आणली.

त्यानंतर पुन्हा 2016 ला  निवडणुक झाली यात हि राष्ट्रवादी काँग्रेस ने २०  पैकी १३ सदस्य निवडुन आणुन राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता राखली .आता माञ या नगरपरिषद वर भाजपा आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या समर्थकांची  सत्ता आहे. तुळजापूरची 2011ला जनगणना झाली त्या नंतर 2014 ला हद्दवाढ झाली. 2011 नंतर जनगणना न झाल्याने 2011चा जनगणेचा आधार घेऊन ही निवडणुक होणार आहे. तुळजापूर शहराची एकुण लोकसंख्या  संख्या 35403 आहे. या पुर्वी येथे दहा प्रभागातुन  वीस नगरसेवक होते 2016ला मतदार संख्या 22 ते 23000 होती आता 2021ला ती 25000 हजारावर जाण्याची शक्यता आहे.

या पुर्वी प्रभाग निहाय निवडणुक झाली आता  एक प्रभाग एक सदस्य निवाडणुक  होणार असल्याने प्रचंड चुरस असणार आहे आता एक एक मताला किमत राहणार आहे.याही निवडणुकीत २० सदस्य राहण्याची शक्यता आहे. नगराध्यक्ष निवडणुक आरक्षण नंतर तिर्थक्षेञ तुळजापूरचा कारभारी कोण असणार हे स्पष्ट होणार आहे.

 
Top