उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्ह्यातील रेल्वेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी  केले. 

शिवसंपर्क अभियानावेळी तुळजापूर तालुक्यातील विविध ठिकाणी पक्ष संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलत होते.    शिवसेना पक्षाचे जनोपयोगी कार्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर  , शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.कैलास घाडगे-पाटील  यांनी तुळजापूर तालुक्यातील काटी, खुंटेवाडी, सावरगाव, केमवाडी, जळकोटवाडी, वडगावकाटी, गंजेवाडी, तामलवाडी, काटगाव, बसवंतवाडी या गावांमध्ये शिवसंपर्क अभियान राबविण्यात आले. या शिव संपर्क अभियानावेळी तुळजापूर तालुक्यामध्ये विविध ठिकाणी पक्ष संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी   तुळजापूर तालुक्यातील मौजे बसवंतवाडी येथील ही शेकडो नागरिकांनी पक्षश्रेष्ठींच्या कामावर विश्वास ठेवून हातामध्ये शिवबंधन बांधून शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश केला.

यावेळी शिवसेना जिल्हा महिला आघाडी प्रमुख श्यामलताई वडणे, माजी उपजिल्हा प्रमुख श्याम पवार, शिवसेना तालुका प्रमुख जगन्नाथ गवळी, माजी उपतालुका प्रमुख प्रदीप मगर, भिमाण्णा जाधव, एच. एम. देवकते, चेतन बंडगर, अर्जुन आप्पा साळुंके, प्रतीक बप्पा रोचकरी, सागर इंगळे, राम मोगरकर यांच्यासह विविध गावातील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top