उस्मानाबाद / प्रतिनिधी-

माहिती आणि तंत्रज्ञानच्या काळात वाचनापासून तरूण पिढी दूर जात आहे. त्यामुळे सोशल माध्यमातून मिळालेली माहिती त्यांना पुरेसी वाटते आहे. परंतु पुस्तकांशी मैत्री करूनच ध्येय साध्य करता येईल. म्हणून कोणताही महापुरूष समजून घेण्यासाठी मुळ साहित्य अभ्यासलं पाहिजे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अभूतपूर्व योगदान देणा-या अण्णा भाऊ साठेंच्या विषयी सुध्दा सोशल माध्यमं पुरेशी माहिती देऊ शकत नाहीत, त्यामुळे कामगार, कष्टकरी, दलित, शेतकरी यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लेखनी झिजवणा-या अण्णा भाऊ साठेंना नव्या पिढीने समजून घेतल पाहिजे, अशी स्पष्टोक्ति धनंजय झोंबाडे यांनी दिली आहे. 

तालुक्यातील सांजा येथील जयंती उत्साहाच्या कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी सरपंच संताजी पवार, उपसरपंच सतिश सुर्यवंशी, गफूर शेख, अनिल (बप्पा) सुयर्वंशी सदस्य संदिपान चांदणे, हनुमंत (आप्पा) सुर्यवंशी, पोलिस पाटील अजय डोंगे, माजी उपसरपंच मुकुंद (बापू) सुर्यवंशी, संजय सुर्यवंशी, तुकाराम चांदणे, संजय साठे, अमोल कांबळे, अजित पेठे, अक्षय चांदणे, बालाजी झोंबाडे, अदित्य जाधव, तानाजी चांदणे, शेखर चांदणे, प्रदिप चांदणे, अमोल चांदणे, अभिजीत झोंबाडे, रविंद्र चांदणे उपस्थित होते.याप्रसंगी लहुजी साळवे कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अभिमान पेठे, शाहीर विकास शितोळे, राज लोंढे, संजय सुर्यवंशी, अदित्य लोंढे यांनीही मनोगते व्यक्त केली.

पुढे बोलताना झोंबाडे म्हणाले की, रूढ अर्थाने साक्षर नसलेल्या अण्णा भाऊनी बिनभिंतीच्या शाळेत अनुभवाचे धडे गिरविले. गावगाड्यातली सुख-दु:ख शब्दबध्द केली. अन्याय आणि अत्याचारावर लेखनी चालवली. समतामूलक समाज निर्माण करण्यासाठी अण्णा आयुष्यभर लिहित राहिले. त्यामुळे अण्णांना केवळ लेखक म्हणून चालणार नाही तर समाजसुधारक, कलावंत, साहित्यिक, कामगार नेते, पत्रकार अशा विविध भूमिकांमधून पाहावे लागेल. कार्यक्रमाचे आयोजन लहुगर्जना ग्रुपचे अध्यक्ष स्वप्निल (भैय्या) चांदणे आणि उपाध्यक्ष स्वराज (भैय्या) चांदणे यांनी तर सुत्रसंचालन स्वप्निल चांदणे आणि आभार बालाजी झोंबाडे यांनी व्यक्त केले.

 
Top