तुळजापूर / प्रतिनिधी-

 तालुक्यातील आरळीखुर्द येथे ग्रामपंचायत च्या वतीने पावसाळा पार्श्वभूमीवर साथीचे रोग पसरु नये यासाठी गावात विविध औषधांच्या  फवारण्या करुन पाणी निचरा होण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या.

तुळजापूर तालुक्यातील आरळीखुर्द येथे पावसाळ्या पार्श्वभूमीवर गावात खड्डे पडुन त्यात पाणी साचले होते या पाण्याचा निचरा करण्याचा उपाययोजना करुन गावात फाँगीग व तण नाशक  फवारणी करण्यात आली तसेच कोरोना वाढू नये यासाठी ग्रामपंचायतचा वतीने जनजागृती करण्यात आली हे काम सरपंच सौ.पल्लवी सतिश गायकवाड व ग्रामसेवक बी.बी कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.


 
Top