लोहारा/प्रतिनिधी

जिल्हा नियोजन समिती उस्मानाबाद अंतर्गत लोहारा शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतील सिमेंट रस्ते व नागरी दलित्तेर वस्ती सुधार योजनेतील पाच हॉयमेस्ट पोल व स्ट्रीट लाईट बसविणे व महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान योजनेतील तीन हॉयमेस्ट पोल व अंतर्गत विद्युत पोल व तारा ओढण्याच्या कामाचा लोकार्पण सोहळा लोहारा शहरातील शिवाजी चौक येथे दि.14 ऑगस्ट रोजी दुपारी दिड वाजता पालकमंत्री शंकरराव गडाख पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. 

यावेळी आ.ज्ञानराज चौगुले, माजी खा.प्रा. रविंद्र गायकवाड, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता,  उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक   विठ्ठल उदमले, मुख्याधिकारी गजानन शिंदे, तहसीलदार संतोष रूईकर, गटविकास अधिकारी सोपान अकेले, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पणुरे, युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके, प्रथम नगराध्यक्षा पोर्णिमा जगदिश लांडगे, माजी नगरसेवक अभिमान खराडे, राजेंद्र भोजने, माजी नगरसेविका कमलताई राम भरारे, जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी, शहर प्रमुख सलीम शेख, सरपंच रितु कुलदिप गोरे, माजी शाम नारायणकर, जगदिश लांडगे, युवा सेना जिल्हा उपप्रमुख तथा सरपंच नामदेव लोभे, युवा शहर प्रमुख श्रीकांत भरारे, माजी पं.स.सदस्य दिपक रोडगे, माजी ग्रामपंचायत सदस्य श्रीशैल्य स्वामी, प्रमोद बंगले, श्रीनिवास माळी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष आयुब शेख, माजी पं.स.सदस्य इंद्रजित लोमटे, अमिन सुंबेकर, महेबुब फकीर, अमिन कुरेशी, सलीम कुरेशी, नितीन जाधव, सरपंच परवेज तांबोळी, बालाजी माशाळकर, गौस मोमिन, युवक काँग्रेस शहराध्यक्ष हरी लोखंडे, माजी नगरसेवक आरीफ खानापुरे आदि, उपस्थित होते.


 
Top