उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हा शासकीय सामान्य रुग्णालयात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने व सध्या सर्दि ताप खोकल्याची साथ असल्याने उपचारासाठी येणार्‍या रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे एखादा रुग्ण गंभीर आजारी असतो तो केसपेपर काढण्यासाठी भल्या मोठ्या रांगेत कसा टिकेल..? तेथील कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे महिला व पुरुषांची नवीन केसपेपर काढण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात रांग लागत आहे..आज सकाळी शासकीय रुग्णालयामध्ये गेलो असता तेथील प्रचंड गर्दी बघून असे वाटले की नक्कीच उस्मानाबाद मध्ये कोरोणाची रुग्ण संख्या वाढणार असून याला जबाबदार मात्र जिल्हा शासकीय रुग्णालय व येथील असुरक्षित व्यवस्था राहणार कि काय..? गर्दी पाहून संबंधित कर्मचाऱ्यांनी कॅम्पुटर वरती नोंदणी पेपर न देता पहिल्यासारखे हाताने लिहून पेपर देण्यास सुरवात केली.

बाल रुग्ण तपासण्यासाठी  एक ही वैद्यकीय अधिकारी नसल्याने मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला. बाल रुग्णाचे नातलग यांनी सदर वैद्यकीय अधिकारी यांच्या कडे गेले असता एक नंबर मध्ये बाल रुग्णास तपासण्याची सोय केली.गरज राहिल वास्तवतेची सकाळच्या वेळी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी रुग्णालयात चक्कर मारुन लक्ष दिले पाहिजे.आज सद्यस्थितीला रुग्णालयात रिक्त पदे असुन ती पदे भरणे आवश्यक आहेत. आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी रुग्णांच्या हितासाठी यशस्वी प्रयत्न केले पाहिजेत, अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे यांनी मिडीयाच्या माध्यमातून केली आहे.

 
Top