उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद जिल्हा ऍथलेटिकस असोसिएशन , श्री तुळजाभवानी क्रीडा प्रबोधिनी  व श्रीराम स्पोर्ट्स अँड गारमेंट यांच्या वतीने  मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. 

यावेळी पुरुषोत्तम रुकमे-जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी, अर्जुन पुरस्कार प्राप्त तथा तालुका क्रीडा अधिकारी श्रीमती सारिका काळे,राष्ट्रीय खेळाडू तथा पंचायत समिती सदस्य गजेंद्र जाधव,जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे सचिव योगेश थोरबोले, जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त तथा क्रीडा शिक्षक राजेश बिलकुले,राष्ट्रीय रौप्य पदक विजेती खेळाडू सोनाली पवार, जिल्हाधिकारी कार्यालयातील राजेश भवाळ,सुजित टिके,अनिल भोसले,मुकुंद चव्हाण,अॅथलेटिक्स कोच ज्ञानेश्वर भुतेकर,अजिंक्य वराळे,प्रशांत बोराडे,प्रदीप पोंदे,सचिन गोयकर, गणेश मुळे,सोनाली पवार,रितेश धोत्रे,विकास लाभे, योगिनी साळुंखे यांचा शाल श्रीफळ व  पुष्प गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त तथा क्रीडा शिक्षक राजेश बिलकुले व आभार व  प्रास्ताविक  जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे सचिव तथा अॅथलेटिक्स कोच योगेश थोरबोले यांनी केले.


 
Top