उस्मानाबाद / प्रतिनिधी-

दीपक विनायक खैरे रा.ईडा ता.भूम जि.उस्मानाबाद हे दि.19 जुलै 2021 रोजी रात्री 09.00 वा.चे दरम्यान  त्याच्या राहत्या घरातून कोणालाही काही एक न सांगता निघून गेला आहे.त्याच्या नातेवाईकाकडे व गावात शोध घेतला असता ते अद्यापपर्यंत घरी परत आलेले नाहीत.

 हा व्यक्ती आढळून आल्यास परंडा पोलीस स्टेशनला संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.बेपत्ता व्यक्तीचे वय-अंदाजे वय-19 वर्ष.उंची-अंदाजे-165 सेमी.कपडे-काळया रंगाचा शर्ट आणि निळया रंगाची जिन्स पॅन्ट.रंग-सावळा.शरीर बांधा -मजबुत.चेहरा-गोल आणि गालावर पांढरा डाग.नाक-लांब.केस-काळे असलेला अशा वर्णनाचा व्यक्ती हरवली असल्याची तक्रार परंडा पोलीस स्टेशनला आली आहे.

 व्यक्तीची माहिती मिळाल्यास पोलीस ठाणे, परंडा फोन नंबर-02477-232026, तपासिक अंमलदार पोना/181 ए. एस. काटवटे मो.9022139224,पो. नि. श्री. एस. बी. गिड्डे-7972071680 येथे संपर्क साधावा,असे आवाहन पोलीस निरीक्षक,पोलीस ठाणे,परंडा यांनी केले आहे.

 
Top